1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (01:23 IST)

शरीरासाठी उबदार पदार्थ : बेसनाचा शिरा, जाणून घ्या सोपी रेसिपी

बेसनाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
200 ग्रॅम बेसन
200 ग्रॅम तूप
200 ग्रॅम साखर
600 मि. ली. दूध
10 चिरलेले बदाम
10 चिरलेले काजू
10 पिस्त्याचे काप
4 वेलची पूड
 
प्रथम कढईत सर्व तूप टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा
तूप वितळल्यानंतर कढईत बेसन घालून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
बेसनाचा रंग बदलून वास येऊ लागला तर समजून घ्या की बेसन भाजले आहे.
नंतर बेसन तूप सोडू लागेल.
आता बेसनामध्ये साखर घाला आणि ढवळा.
बेसनाच्या पिठात साखर घालून ती भाजल्याने शिर्‍याला चांगला रंग येतो.
आता गॅस मंद करा आणि बेसनामध्ये दूध घालत राहा.
बेसन मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
त्याच बरोबर गुठल्या फोडून घ्या.
बेसनाचे पीठ घट्ट झाल्यावर त्यात चिरलेले सुके मेवे टाका.
वेलची पूड घालून मिक्स करा.