शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (11:14 IST)

Guru Purnima Prasad गुरुपौर्णिमा निमित्त खीर बनवा, जाणून घ्या रेसिपी

साहित्य -
100 ग्रॅम तांदूळ, 2 लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, 1 चमचा वेलची पूड, 8 -10 बारीक कापलेले बदाम, 8 -10 बारीक कापलेले काजू, 1 चमचा चारोळ्या, 1 चमचा साजूक तूप.
 
कृती -
सर्वप्रथम आपण तांदुळाला स्वच्छ करून धुऊन घ्या. त्यातले पाणी उपसून चाळणीत 5 मिनिटासाठी ठेवावं, एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून त्यात तांदूळ घाला आणि मंद आचेवर तांदूळ परतून घ्या. 
 
एका भांड्यात दूध घ्या आणि उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळून झाल्यावर त्यामध्ये भाजलेले तांदूळ टाका. आता हे 8 ते 10 मिनिटे तांदूळ ढवळून शिजवायचे आहे. तांदूळ ढवळत राहावे जो पर्यंत ते गळत नाही. गळल्यावर त्यामध्ये साखर मिसळा. साखर विरघळून झाल्यावर सुकेमेवे घालावे. या खिरीला 8 ते 10 मिनिटा पर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या. खीर घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घाला आणि मोठ्या गॅस वर 2 मिनिटे शिजवा. आपली खीर तयार.