रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात

घरात ठेवलेले मातीचे भांडे देखील तुमचे भाग्य उजळू शकतात. शास्त्रानुसार मातीच्या भांड्यांना फारच पवित्र मानण्यात आले आहे. आधी मातीने तयार केलेल्या भांड्यांमध्ये जेवण केले जात होते. वास्तूप्रमाणे घरात ठेवलेले मातीचे भांडे जेथे एकीकडे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात तसेच यांचे घरात किंवा ऑफिसमध्ये असल्याने तुम्ही गुडलक, धन-वैभव, यश सर्व काही मिळवू शकता. देवाघरापासून लग्नाच्या सोहळ्यापर्यंत पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व भांडे मातीचे असतात.   
 
घरात ठेवा माठात पाणी  
वास्तूनुसार असे म्हटले जाते की घरातील उत्तर पूर्व दिशेत मठात पाणी भरून ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे अधिक फायदेशीर असत. वास्तूनुसार जर एखादा व्यक्ती ताण तणाव किंवा मानसिक समस्येचे शिकार असेल तर त्यांनी त्या माठाचे पाणी प्यायला पाहिजे.  
 
घरात पूजेसाठी देवाची मूर्ती जर मातीची आणाल तर तुमच्या घरात नेहमी बरकत राहील. एवढंच नव्हे तर घरात मातीचे सजावटी भांडे जसे वाटी, फ्लावर पॉटला  दक्षिण-पूर्व दिशेत ठेवू शकता. असे केल्याने घरात सौभाग्य वाढत.