1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

किचन टिप्स

ND
* तांदुळाच्या डब्यात नींबाची पाने, लसूणाच्या पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे टाका. याने कीडे लागणार नाहीत.
* भाजीत मीठ जास्त झाले तर भाजलेले तांदुळाचे पीठ टाका.
* बटाटे उकळविण्यासाठी पाण्यात आधी सिरका टाका.
* डोसा बनविताना तांदूळ भिजविताना त्यात मेथीचे दाणे टाका. किंवा थोडी तुरीची डाळ टाका.
* कच्ची केळी आणि बटाटे कापताना पानी टाकून ठेवा. याने ते काळे पडणार नाहीत.
* हिरव्या मटरचा रंग टिकविण्यासाठी ते उकळविताना त्यात एक चिमूटभर साखर टाका.
* हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस ताजे राहवेत यासाठी त्यांना प्रिजमध्ये ठेवताना त्यांना पेपरमध्ये गुंडाळून ठेवा.
* जवस आणि गव्हाचे कणीक सारख्या प्रमाणात घेऊन पोळ्या बनविल्याने चव छान लागते.
* बदामाचे साल काढण्यासाठी बदाम एक मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवा.
* फोडलेले नारळ ताजे राहवे यासाठी नारळाच्या आतील भागात थोडे मीठ घासून ते फ्रिजमध्ये ठेवा. याने नारळ लवकर वाळणार नाही.
* भाज्यांना चांगली तरी आणण्यासाठी कांद्याच्या मसाला भाजताना दही टाका याने भाजीचा स्वादही वाढेल.
* वडे बनविल्यानंतर सर्व्ह करण्याआधी त्याच्यावर काळे मीठ शिंपडा. वडे स्वादीष्ट बनतील.
* चीज व्यवस्थित कीसायचे असेल तर आधी ते फ्रिजमध्ये ठेवा.
* चींच किड्यांपासून वाचविण्यासाठी त्यात मीठ ठाकून एअर टाईट डब्यात ठेवा.
* मिरची पुडाला जाळे लागू नये म्हणून त्यात जाड मीठाचे खडे ठेवा.
* जॅम-जेली आणि मुरांबा यांना मुंग्या लागू नयेत म्हणून कपड्याच्या पट्टीला सरसोचे तेल लावून झाकणाच्या चारी बाजूंनी ही पट्टी लपेटून घ्या.
* पुलाव बनविताना तांदळात गरम पाणी टाका. पानी आणि तांदुळचे तापमान सारखेच झाल्याने तांदुळ छान फुलतिल.
* क‍िसलेली लौकि, लाल भोपळा, किसलेले आवळे पाण्यात टाकल्याने त्यांची रंग तसाच राहतो.
* लोणच्यात एक चमचा निंबू रस टाकल्याने लोणच्याची चव वाढते.