1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मिक्स व्हेज धिरडे

ND
साहित्य : कणीक- 1/2 वाटी, बेसन - 1/2 वाटी, तांदुळाची पिठी- 1/2, बटाटे, दुधी भोपळा, मुळा, गाजर, कांदा, कोथिंबीर, मिरची, सिमाला मिरची 1 वाटी, सर्वांना थोड्या मात्रात घेऊन किसून घ्यावे. तिखट-मीठ चवीनुसार, आदरक-लसणाची पेस्ट, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्व भाज्यांना मीठ लावून गरम पाण्यात टाकून नरम करून घेणे. त्यात सर्व प्रकारचे पीठ टाकावे. आदरक-लसणाची पेस्ट टाकावी व पाणी घालून पातळ घोळ करावा. मंद आचेवर तव्यावर तो घोळ पसरून दोन्हीकडून तेल लावून तळावे. गरमागरम धिरडे लिंबाच्या लोणच्या सोबत सर्व्ह करावे. हे धिरडे पौष्टिक असतात.