राजगिर्याच्या पिठाचा उपमा
साहित्य : एक वाटी राजगिरा पीठ, ऐक मोठा चमचा तूप, एक चमचा जिरे, 3-4 हिरव्या मिरच्या, मूठभर भाजलेले शेंगदाणे, एक मध्यम बटाटा, एक चमचा लिंबाचा रस, चवीला मीठ, साखर. कृती : सर्वप्रथम राजगिर्याचे पीठ कोरडे खमंग भाजून घ्यावे. बटाट्याच्या फोडी करून घ्याव्या. तूप तापवून जिरे टाकावेत नंतर मिरच्यांचे तुकडे आणि शेंगदाणे घालून परतावे. बटाटे घालावेत, बटाटे परतल्यावर राजगिर्याचे पीठ घालून परतावे. उकळते पाणी घालून पीठ शिजवून घ्यावे. ओल्या खोबर्याने सजवावे.