लागणारे जिन्नस: ताजे दही 500 ग्रॅम, पाणी दोन कप, दोन मोठे चमचे साखर, एक छोटा चमचा मीठ, एक छोटा चमचा जिरे पूड, 1/4 कप पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार बर्फ.
करावयाची कृती: पुदिन्याची पाने चिरून घ्या. दह्यात पाणी, साखर आणि मीठ टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. ग्लासात टाकून बारीक चिरलेला पुदिना आणि कुटलेला बर्फ टाका. लस्सीच्या ग्लासात वरून भाजलेली जिरेपूड टाका आणि सर्व्ह करा.