1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:02 IST)

चमचमीत चविष्ट आलू मंच्युरियन

साहित्य -
4 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे, 4 हिरव्या मिरच्या, मीठ आणि काली मिरपूड चवीप्रमाणे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 चमचे ,मैदा, 3 चमचा कॉर्न स्टार्च, 2 ढोबळी मिरच्या,2 कांदे,4 -5 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच तुकडा आलं, 1  कांद्याची पात, 2 चमचे कोथिंबीर, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 लहान चमचा रेडचीली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा व्हिनेगर, साखर चिमूटभर,   
 
कृती -
 
कच्या बटाट्याला किसून त्यामधील स्टार्च काढून घ्या. त्यामध्ये काळी मिरपूड, मीठ,हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट,मैदा आणि कॉर्न स्टार्च घाला. 
आता ह्याचे बॉल्स बनवा आणि दोनदा तळा. आधी हाफ फ्राय नंतर पूर्ण तळून घ्या.  
सॉस बनविण्यासाठी सर्व भाज्या मोठा गॅस करून 1 ते 2 मिनिटे तळून घ्या. त्यात सर्व सॉस घाला.
सिजनींग करण्यासाठी मीठ, काळी मिरपूड, 1 चमचा कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून घाला. जेणे करून सॉस मध्ये चांगली चव येईल आता सॉस उकळवून घ्या गॅस बंद करून त्यात बटाट्याचे मंचुरियन बॉल घाला. 
आलू मंच्युरियन खाण्यासाठी तयार. गरम सर्व्ह करून स्पायसी चव चा आनंद घ्या.