घरीच बनवा ढाबा स्टाईल आलू पराठे  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  साहित्य-
	2 कप गव्हाचे पीठ 
	6 उकडलेले पराठे 
	4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
				  													
						
																							
									  
	1 इंच आले किसलेलं 
	अर्धा चमचा जिरे
	1 कांदा बारीक चिरलेला 
	1 चमचा हरवी कोथिंबीर बारीक चिरलेली 
				  				  
	चवीनुसार मीठ 
	 
	कृती-
	ढाबा स्टाइल आलू पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी 2 कप पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्या. आता मळलेल्या गोळ्याला पाच मिनिट बाजूला झाकून ठेवावे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	त्यानंतर उकडलेल्या बटाट्यांमध्ये मीठ घालावे. तसेच आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आले घालावे व हे मिश्रण मिक्स करावे. 
				  																								
											
									  
	 
	आता कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. त्या तेलामध्ये जिरे घालावे. व बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालावी. व परतवून घ्यावे. 
				  																	
									  
	 
	तसेच आता कढईमध्ये मॅश केलेले बटाटे घालावे व परतवून घ्यावे तसेच दोन मिनिट झाकण ठेऊन वाफ भरू द्यावी. 
				  																	
									  
	 
	आता भिजवलेल्या कणकेचे गोळे बनवून घ्यावे. व त्यामध्ये ही तयार केलेली बटाटयाची भाजी भरावी. व पराठा लाटून घ्यावा. 
				  																	
									  
	 
	आता तवा गरम करून त्यावर पराठा टाकावा. व दोन्ही बाजूंनी तेल लावून शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला कमी वेळात ढाबा स्टाईल आलू पराठा, जो तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करू शकतात. 
	
		अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
		 
		Edited By- Dhanashri Naik