शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (00:46 IST)

सुक्या मेव्याची चटणी

साहित्य : मोठ्या आकाराच्या लिंबाएवढी चिंच. दोन चमचे किसलेला गूळ, एक चमचा बेदाणे, दहा काजू, एक चमचा भाजून साल काढलेले दाणे, एक चचा सुक्या खोबर्‍याचा कीस अर्धा चमचा तिखट, चवीपुरते मीठ, एक चमचा तीळ, अर्धा चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड. 
 
कृती : चटणी करण्‍यापूर्वी चिंच स्वच्छ धुवून दोन तास अगोदर भिजत घाला. तिचा कोळ काढून तो गाळून घ्या. तीळ व खोबर्‍याचा कीस वेगवेळे भाजून घ्या. मिक्सरच्या छोट्या भांड्यात काजू व दाणे यांची चांगली बारीक पूड करून घ्या. त्यातच तीळ व खोबरे यांचीही पूड करा. एका जाड बुडाच्या कढईत चिंचेचा कोळ घालून त्यात वरील सर्व पुडी, तिखट, मीठ, बेदाणा, गूळ घालून मंद आचेवर चटणीला चमक येईपर्यंत शिजवा. हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही. शेवटी जिरेपूड घालून गॅस बंद करा.