मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (17:05 IST)

वजन कमी करण्यासाठी न्याहारीमध्ये बाजरा खिचडी खा, कृती जाणून घ्या

Bajare Khichadi Recipe जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी चांगल्या नाश्त्याचा पर्याय शोधत असाल तर आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही कारण तुम्ही बाजरीची खिचडी करून पाहू शकता. तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. बाजरीत अनेक पोषक घटक असतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यात तूप टाकून दह्यासोबत खाल्ल्याने चव येते. बाजरीची खिचडी बनवण्याची पद्धत जाणून घ्या-
 
बाजरीची खिचडी बनवण्यासाठी साहित्य - एक वाटी बाजरी, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी चिरलेले गाजर, अर्धी वाटी बीन्स, मटार अर्धी वाटी, हिरवी धुतलेली मूग डाळ अर्धी वाटी, कांदा अर्धी वाटी, हळद, एक टीस्पून मीठ, एक टीस्पून जिरे, एक चमचा मीठ, तिखट एक चमचा, तेल एक चमचा
 
बाजरीची खिचडी बनवण्याची पद्धत- बाजरीची खिचडी बनवण्यासाठी मूग डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. यानंतर बाजरी धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर प्रेशर कुकर घ्या, त्यात एक चमचा तेल घाला. यानंतर त्यात जिरे, चिरलेला कांदा घालून तांबूस रंग येईपर्यंत परता. त्यात गाजर, चिरलेली बीन्स आणि मटार घाला. नीट मिक्स करा, आता त्यात मूग डाळ बाजरी घाला आणि नंतर त्यात एक कप पाणी घाला. यानंतर ते उकळून घ्या आणि आता त्यात एक चमचा मीठ, लाल तिखट आणि हळद घाला. आता ते शिजवा आणि घट्ट झाल्यावर त्यात थोडे पाणी घालून कुकरचे झाकण झाकून ठेवा. यानंतर 3 शिट्ट्या होऊ द्या. 10 मिनिटांनी गरमागरम खिचडी दह्यासोबत सर्व्ह करा.