शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

खमंग काकडी

साहित्य- 2-3 कोवळ्या काकड्या, अर्धी वाटी दाण्याचं कूट, पाव कप नारळाचा चव, मीठ,  2 हिरव्या मिरच्या, ‍2 चमचे लिंबाचा रस, साखर, चिरलेली कोथिंबीर, तुप, जीरे.
 
कृती- काकडीचे सालं काढून दोन्ही टोकं कापून मीठ लावून चोळून घ्या, म्हणजे काकडीतील कडवटपणा जाईल. काकडी बारीक चोचून थोडं साजुक तूप चोळा म्हणजे पाणी सुटणार नाही. लिंबाचा रस, मीठ, चवीपुरती साखर टाका. तुप गरम करून जीरे आणि मिरच्यांची फोडणी घाला, हळद घालू नका. दाण्याचं कूट टाकून अलगद कालवा.