शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (11:49 IST)

मिक्स व्हेज ग्रिल सँडविच

सकाळच्या न्याहारीत काही निरोगी आणि चविष्ट खायचे असले तर आपल्या डोळ्यापुढे चटकन तयार होण्यासारखे पदार्थ म्हणून सँडविच. जे प्रत्येकाला आवडते आणि चटकन तयार होते. जर ते सँडविच आरोग्यवर्धक असेल तर अति उत्तम. चला तर मग अशा चमचमीत चविष्ट आणि आरोग्यवर्धक सँडविच करण्याची रेसिपी जाणून घेऊ या.
 
साहित्य -
1 चमचा लोणी, 1 चमचा तेल, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा चिली फ्लेक्स, हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 ढोबळी मिरची, 1 कप कोबी, 1 गाजर किसलेली, काळी मिरी पूड, मीठ, ब्रेड स्लाइस, मेयोनिझ, थोडंसं लोणी ग्रिल करण्यासाठी. 
 
कृती - 
ग्रिल सँडविच बनविण्यासाठी सर्वप्रथम पॅन मध्ये तेल आणि लोणी घाला. या मध्ये चिली फ्लेक्स आणि आलं लसूण पेस्ट घालून तसेच हिरव्या मिरच्या, कांदा, ढोबळी मिरची घालून परतून घ्या. या सह मीठ, कोबी, गाजर घालून मिसळा. आता हे मिश्रण भांड्यात काढून घ्या आणि 5 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा. या मध्ये काळी मिरपूड आणि मेयोनिझ घालून मिसळा. 
 
ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर तयार व्हेज चे सारण घाला आणि दुसरी कडून देखील ब्रेडच्या स्लाइसने कव्हर करा. नंतर दोन्ही बाजूने लोणी लावा आणि ग्रिलर मध्ये ठेवा. आपली ग्रिल सँडविच खाण्यासाठी तयार. व्हेज ग्रिल सँडविच सॉस किंवा हिरव्या चटणी सह सर्व्ह करा.