शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (15:17 IST)

Paneer Do Pyaza अगदी रेस्टोरंट स्टाईल पनीर दो प्याजा घरी बनवा झटपट

साहित्य:
250 ग्रॅम पनीर
4 कांदे
4 टोमॅटो
1 टेस्पून आले-लसूण पेस्ट
2 हिरव्या मिरच्या
2 टीस्पून धणे पूड
1 चमचा हळद
1/4 टीस्पून लाल तिखट
1 चमचा गरम मसाला पावडर
1 टेस्पून मलई 
1 टीस्पून साखर (पर्यायी)
3 लहान वेलची
1 चमचा कसुरी मेथी
1 तमालपत्र 
1 टीस्पून जिरे
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तेल
 
कृती
पनीर चौरस तुकडे करा. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवा. 2 कांदे बारीक चिरून घ्या. उर्वरित 2 कांदे मोठ्या तुकडे करा. गॅसवर नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात कांद्याचे मोठे तुकडे घाला आणि सोनेरी होईपर्यंत तळा. प्लेटमध्ये तळलेले कांदे बाहेर काढा. आता त्याच पॅनमध्ये आणखी तेल गरम करा. त्यानंतर तेलात जिरे, तमालपत्र आणि छोटी वेलची घालून मिक्स करा. नंतर कढईत बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो गोल्डन होईपर्यंत शिजवा. आता आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून एक मिनिट शिजवा. नंतर टोमॅटो प्युरी, हळद, धणे, गरम मसाला, तिखट, साखर आणि मीठ घालून मध्यम आचेवर ग्रेव्ही शिजू द्या. तेल ग्रेव्हीपासून वेगळे होईपर्यंत शिजवा. आता ग्रेवरीवर कसुरी मेथी, तळलेले कांदे आणि एक वाटी पाणी घालून भाजीला 5 मिनिटे शिजवा. नंतर भाजीमध्ये पनीर आणि मलई घाला आणि त्यात मिसळा आणि गॅस बंद करा. पनीर दो प्याजा तयार आहे.