मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

टोमॅटो जॅम रेसिपी, कसा बनवाल जाणून घ्या

टोमॅटो सॉस अनेकांना आवडतो पण काही वेळेस टोमॅटो सॉस खाऊन देखील कंटाळा येतो म्हणून आज काहीतरी नवीन ट्राय करूया तर चला बनवू या टोमॅटो जॅम, टोमॅटो जॅम रेसीपी कशी बनवावी लिहून घ्या.
 
साहित्य-
एक किलो पिकलेले टोमॅटो 
3/4 चमचे गूळ 
चिमूटभर मीठ 
दोन मोठे चमचे लिंबाचा रस 
2 स्टिक दालचीनी पावडर  
6 लवंग 
 
कृती-
टोमॅटो जॅम रेसिपी बनवण्यासाठी टोमॅटो धुवून घ्या व क्रॉस मध्ये कापावे. पाणी चांगल्यापरकरे उकळू द्यावे मग गॅस बंद करून त्यामध्ये टोमॅटो घालावा. कमीत कमी 10 मिनिट तसेच राहू द्यावे. यामुळे टोमॅटोचे साल निघण्यास मदत होईल. पाण्यातून काढल्यानंतर टोमॅटोचे साल काढून घ्यावे. हे टोमॅटो बारीक कापावे. एका मोठ्या कढईमध्ये हे टोमॅटो घालावे व घट्ट होइसपर्यंत शिजवावे. मग मध्ये गूळ, दालचिनी पूड, लवंग घालावी. तसेच हे मिश्रण मिक्स करून घट्ट होइसपर्यंत परतवावे. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालावा. कमीत कमी दहा मिनिट थंड होण्यास ठेवावे व एका स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरावा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावे. तर चला तयार आहे आपली टोमॅटो जॅम रेसीपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik