testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Veg Recipe : वांग्याचे भरीत

bharit
वेबदुनिया|
साहित्य : 500 ग्रॅम ताजे वांगे, 2 कापलेले कांदे, 1/2 कप दही, 8 पाकळ्या लसुणाच्या बारीक कापलेल्या, 3 हिरव्या मिरच्या, दीड मोठा चमचा तेल, कोथिंबीर, 1 लिंबू, मीठ चवीनुसार.
कृती : ओव्हन किंवा विस्तवावर वांग्याला चांगले भाजावे. भाजण्याआधी वांग्याला थोडं तेल चोपडावे म्हणजे साल सहजतेने निघेल. साल काढलेले वांगे चांगले हाताने मळावे व त्यात मीठ, दही मिसळावे. कढईत तेल गरम करून कांदे, लसूण व हिरवी मिरची भाजावी नंतर वांगे टाकावे. जेव्हा वांग्याचे भरीत तेलात सोडाल तेव्हा एक लिंबू पिळावा आणि कोथिंबीर घालून खाली उतरवावे. नान, पोळी सोबत गरम गरम वाढावे.


यावर अधिक वाचा :