testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मटार रोल्स

Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (14:52 IST)
साहित्य:
– हिरवे वाटाणे – एक मोठी वाटी
– उकडलेले बटाटे – दोन-तीन
– किसलेले चीज – दोन मोठे चमचे
– खोबरे – अर्धी वाटी
– हिरव्या मिरच्या – चार
– एका लिंबाचा रस
– अर्धा इंच आले
– एक बारीक़ चिरलेला कांदा
– मीठ
– साखर – चवीप्रमाणे
– तळण्यासाठी तेल
– पावचा बारीक चुरा – आवश्‍यकतेनुसार
कृती : – सर्वप्रथम उकडलेला बटाटा नीट बारीक स्मॅश करून घ्या.
– या स्मॅश केलेल्या बटाट्यात मीठ, साखर, लिंबू पिळून घ्या
– नंतर वाटाणा उकडून बारीक़ करून घ्या.
– त्यात किसलेले चीज, खोबरे, मिरची, आले, बारीक़ चिरलेला कांदा, मीठ, साखर व लिंबाचा रस पिळा.
– बारीक केलेल्या बटाट्याच्या सारणाच्या दोन छोट्या आकाराच्या पुऱ्या करून वाटाण्याचे सारण त्यात भरून रोल तयार करा.
– हा रोल पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या.
– तेलात मंद गुलाबी रंग येईपर्यंत हा रोल तळा.
– आता हा मटार रोल सॉसबरोबर सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

धोनीसमोर मोठे आर्थिक संकट ?

national news
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका अडचणीत सापडला आहे. काही ...

जिथे मेहनत, तिथे यश, मिळाली 3.8 कोटींची शिष्यवृत्ती

national news
उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील प्रतिष्ठित ...

माऊंट एव्हरेस्टवर कचऱ्याचे साम्राज्य

national news
माऊंट एव्हरेस्टवर आणि त्याच्या मार्गावर गिर्यारोहकांची संख्या वाढत असल्याने कचराही वाढत ...

पुणे लाचखोरीतही पुढे, राज्यात ठरले अव्वल

national news
राज्यात पुणे लाचखोरीमध्येही अव्वल आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात ३५ ...

जपानमध्ये भूकंप, तीव्रता ६.१ रिश्टर स्केल

national news
पश्चिमी जपानमधील मेट्रोपॉलिटन शहर असलेल्या ओकासामध्ये झालेल्या भूकंपामध्ये तीन जण ...