शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

पंचभेळी वांगी

साहित्य- अर्धा किलो वांगी, 1 लांबट मुळा, 1 गाजर, मटार अर्धी वाटी, मेथी, टोमॅटो, 3 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे चिरून, बोरे.
मसाला- किसलेले सुके खोबरे पाव वाटी, 2 चमचे काळा मसाला, एक कांद्या तळलेला, पाव चमचा मेथीदाणे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरेपूड.
कृती- सर्व मसाला किंचित भाजून वाटा. नेहमीप्रमाणे फोडणी करून हिरवी मेथी घाला. इतर भाज्या घाला. मीठ, बोरे घाला. मग पाणी व मसाला घाला. भाज्या थोड्या शिजल्यावर टोमॅटो व गूळ घाला. टोमॅटोऐवजी चिंचही घालू शकता. पोळी किंवा भाकरीबरोबर खा.