मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (13:32 IST)

मुंबईत नायजेरियनसह 1.35 कोटी रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त, तीन तस्करांना अटक

drugs
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने दोन वेगवेगळ्या भागातून नायजेरियनसह तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 1.35 कोटी रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केले.   
 
मुंबई पोलिसांनी सांगितले की, अमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे युनिटने दोन तस्करांना अटक केली आणि त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 
Edited By- Priya Dixit