testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ताज महाल पहायचा मग फक्त तीन तास

tajmahal
‘ताजमहाल’ ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना फक्त ३ तासांचा लाभणार आहेत. नियोजित तीन तासांत केवळ ४० हजार पर्यटकांनाच ताजमहाल पाहता येणार असून हा नवीन नियम
२० जानेवारीपासून
लागू करण्यात येणार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. विदेशी पर्यटकांसाठी मात्र हा नियम लागू करण्यात आलेला नाही.

या नवीन नियमात
४० हजार पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ४० हजारांची संख्या पार केल्यानंतर ज्या पर्यटकांना ताजमहल पाहायचा असेल त्यांना तिकिटीसाठी १ हजार रुपये मोजावे लागतील. सुट्ट्यांच्या काळात ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या ही दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या घरात असते, त्यामुळे सुरक्षेच्या कारण्यास्तव ही मर्यादा घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


यावर अधिक वाचा :