testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एसआयटीचा मोठा खुलासा, हिंसा भडकवण्यासाठी डेराने ५ कोटी दिले

Last Modified शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:25 IST)
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला
बलात्कारप्रकरणी अटक करून दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा सच्चा सौदाने हिंसाचार भडकवण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याची माहिती एसआयटीने दिली आहे. पंचकुलामध्ये राम रहीमला झालेल्या अटकेनंतर पंचकुलामध्ये झालेलेल्या हिंसाचारामध्ये डेरा सच्चाशी संबंधित असलेले आदित्य इंन्सा, हनिप्रीत इन्सा आणि सुरिंदर धीमान इन्सा हे सहभारी असल्याचे समोर येत आहे.

डेरा सच्चा सौदाच्या पंचकुला शाखेचे प्रमुख असलेल्या चमकौर सिंह यांच्याकडे डेरा व्यवस्थापनाने पैसे खर्च करण्याची जबाबदारी सोपवल्याचे तपासामध्ये
उघड झाले आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील ढकोली गावातील रहिवासी असलेल्या चमकौर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.


यावर अधिक वाचा :