मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:53 IST)

सर्वाधिक बनावट ,दर्जाहीन संशोधन नियतकालिके भारतात तयार होतात

आपल्या देशात आपण आधीच खोट्या बनवट आणि चोरी करून तयार केलेल्या पदव्या आणि पी.एच.डी. यामुळे बदनाम आहोत, आता ही बदनामी आपण देश सोडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही  मिळवली आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामध्ये जगातील संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य असलेले  ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने मोठा सर्वे केला आहे. त्यांच्या नुसार आपल्या देशात सर्वाधिक बनावट , दर्जाहीन संशोधन नियतकालिके तयार होत आहेत. जागतिक पातळीवर बनावट संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या शोधनिबंधांपैकी जवळपास ३० टक्के शोधनिबंध हे भारतीय असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला आपले अनेक हुशार विद्यार्थी नासा आणि इतर ठिकाणी काम करत आहेत. मात्र या सर्वेमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसला आहे. आपल्या देशात काही न पाहता पीएच.डी. अर्थात विषयातील डॉक्टरेट  संशोधनासाठी दिली जाणारी पदवी सर्रास वाटण्यात येत हे सत्य  आहे. यात प्रमुखपणे  पदवी, वेतनवाढ मिळवण्यासाठी अनेक खोट्या  ‘आंतरराष्ट्रीय’ संशोधन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध छापून आणले जात आहेत. तर ही  आंतरराष्ट्रीय असल्याची बतवानी करत नियतकालिके अगदी छोटय़ा गावातील महाविद्यालयाकडूनही प्रकाशित केली जात आहेत. मात्र ही बनवेगिरी उघड झाली असून या खोट्या नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या भारतीय लोकांवर परदेशी संस्थांनीही मोठा खुलासा केला आहे.अभियंत्यांच्या एका जागतिक संघटनेने भारतातील हजारो प्राध्यापकांचे शोधनिबंध फक्त चोरी केलेलं संशोधन  असल्यामुळे नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी बंदी घातली. आता तर  ‘नेचर्स’ या संशोधन नियतकालिकाने बनावट किंवा दर्जाहीन संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांचा अभ्यास केला तेव्हा अनेक भारतीय हे खोटे संशोधन निबंध छापून आणते असे उघड झाले आहे.