सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:19 IST)

कुत्र्याने वाचवले मालकाचे प्राण

पुण्यात रहाणाऱ्या डॉक्टर रमेश संचेती (६५) यांच्यासाठी त्यांचा कुत्राच देवदूत ठरला आहे. कारण ब्राऊनीने रमेश संचेती यांचे शेजारी अमित शाह यांना सतर्क केले संचेती यांचे प्राण वाचले.
 
२३ जानेवारीला बुधवारी रमेश संचेती यांना अंशत: पक्षघाताचा आणि मायनर ह्दय विकाराचा झटका आला. त्यादिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शाह यांनी ब्राऊनीला जेवण भरवण्यासाठी आणले होते. पण ब्राऊनी काही खात नव्हता. तो सतत संचेती यांच्या बेडरुमच्या खिडकीच्या दिशेने जात होता. काहीतरी चुकतय हे शाह यांच्या लक्षात आले. शाह यांनी बेडरुमच्या खिडकीची फट होती त्यातून आता पाहिले तर संचेती हे जमिनीवर कोसळलेले होते. शाह यांनी लगेचच दरवाजा उघडला व संचेती यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. 
 
यावेळी ब्राऊनी सतत त्याचे पुढचे पाय खिडकीला लावण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मला नेमकं तो काय करतोय ते लक्षात येत नव्हतं. जेव्हा मी पुढे जाऊन बघितलं तेव्हा डॉक्टर जमिनीवर पडलेले होते असे अमित शाह यांनी सांगितले.