testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शहिदांना धर्म नसतो : अनबू

devraj
श्रीनगर| Last Modified गुरूवार, 15 फेब्रुवारी 2018 (09:19 IST)
सुंजवान हल्ल्यात शहीद झालेले पाचही जवान मुस्लीम होते, असे सांगत शहिदांच्या बलिदानाला धार्मिक रंग देणारे एआयएआयएचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लष्कराने फटकारले आहे. शहिदांना कोणताही धर्म नसतो. आम्ही बलिदानाला धार्मिक रंग देत नाही. ज्यांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात, अशा शब्दात कमांडर लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी ओवेसी यांना त्यांचे नाव न घेता फटकारले आहे.
ओवेसी यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केले होते. सुंजवानधील हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण काश्मिरी मुसलामान होते. जे लोक मुसलमानांना आजही पाकिस्तानी समजतात, त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे, असे ओवेसी म्हणाले होते.

काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप दोघेही सत्तेत बसून नाटके करत असून सत्तेची मलई खात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.

ओवेसी यांच्या या वक्तव्याचा त्यांचे नाव न घेता देवराज यांनी समाचार घेतला. शत्रूंना नैराश्य आले आहे. जेव्हा ते सीमेवर असतात तेव्हा ते लष्कराच्या तळावर हल्ला करतात, असे सांगतानाच देशाच्या विरोधात जेकोणी उभे राहतील ते आमच्यासाठी अतिरेकीच असून आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशाराही देवराज यांनी दिला.
माझ्या घरातही एक धार्मिक स्थळ असून तिथे सर्व धर्मांची प्रतीके आहेत. ज्या लोकांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते अशा प्रकारची विधाने करतात, असेही त्यांनी सांगितले. तरुणांचे दहशतवाद्यांकडे आकर्षित होणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगतानाच, सोशल मीडियामुळेच तरुण दहशतवादाकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

national news
मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ...

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

national news
ओडिसामध्ये नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या ...

सोन्याचे फुलपात्र दान

national news
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या ...

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

national news
गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या ...

कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक ...

national news
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा ...