शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भागवतांचे वक्तव्य संघाची मानसिकता - पाटील

भारतीय सैन्यापेक्षा कमी वेळात संघाचे स्वयंसेवक दोन दिवसांत युद्धासाठी सज्ज होतील, असे वक्तव्य करुन रा.स्व.सं.चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताचे सैन्य आणि कोट्यवधी भारतीयांचा अवमान केला आहे. या वक्तव्यावरूनच संघाची मानसिकता उघडी पडली असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी केली आहे. भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली आहेत.
 
अहोरात्र मेहनत घेऊन भारतीय सैनिक देशाचे संरक्षण करत असतात. भागवतांचे वक्तव्य सैन्यदलाचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे भागवत यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी युवकचे औरंगाबाद शहराध्यक्ष दत्ता भांगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अहमदनगर शहराध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली वरील शहरात आंदोलने झाली.