testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गोवा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध

पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं दंडनीय अपराध ठरणार आहे.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या नव्या नियमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.देशाच्या विविध भागातून आणि परदेशातून आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर तसंच बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडेच टाकून जात असल्याचं आढळलं होतं. त्यामुळे कचरा उचलून साफ सफाई करण्याचं सरकारी यंत्रणेचं काम वाढलं आहे.


यावर अधिक वाचा :