रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (15:53 IST)

लालू यांच्या पॅरोलमध्ये वाढ नाही, झारखंड न्यायालयाचा नकार

माजी रेल्वे मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तसेच लालूप्रसाद यादव यांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास झारखंड उच्च न्यायालयाने नकार दिली. कोर्टाने ३० ऑगस्टपर्यंत लालूंना जेलमध्ये परतण्यास सांगितले. लालु यादव चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत आहेत.
 
लालू यादव प्रकृती अस्वस्थामुळे गेले काही महिने पॅरोलवर बाहेर आहेत. यादव यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होअसून, कोर्टातून त्यांच्या मिळालेली पेरॉलची मुदत संपत आहे. लालू यांनी तीन महिने पॅरोल वाढवून मिळावा अशी कोर्टाकडे विनंती अर्ज केला आहे. कोर्टाने ही विनंती धुडकावून लावत ३० ऑगस्टपर्यंत त्यांना जेलमध्ये हजर होण्याचे आदेश दिले आहेत.