शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:28 IST)

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकाच प्रचाराच्या तोफा थंडावल्या

सिमला -हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. त्या राज्यातील विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी 9 नोव्हेंबरला (गुरूवार) मतदान होईल.
 
हिमाचलच्या सत्तेसाठी कॉंग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत होत आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांभाळली. मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. तर राहुल यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकार तसेच भाजपला लक्ष्य केले. कॉंग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे केले आहे. भाजपनेही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना प्रेमकुमार धुमल यांनाच पुन्हा पसंती दिली. कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत एकूण 337 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. हिमाचलमध्ये एकूण 50 लाख 25 हजार 941 मतदार आहेत. राज्यभरातील 7 हजार 521 केंद्रांवर मतदान होईल. गुजरातबरोबरच हिमाचलमध्ये 18 डिसेंबरला मतमोजणी होईल.