शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:06 IST)

दहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली

दहा दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार  अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र हे  वृत्त नुकतंच सर्वांच्या समोर आलं आहे.तर  शरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजकारात  भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं असे केले असावे असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं तर राज्यातील सत्तेत राहायचं की नाही अशी चर्चा झाली आहे.  या वृत्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यात मुख्य कारण असे की  नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश नको म्हणून  शिवसेनेनं भाजपविरोधी लढाई सुरु केली आहे.  राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.