शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2017 (15:47 IST)

बुलेट ट्रेन नको असेल तर बैलगाडीने फिरा - मोदींची विरोधकांनवर टीका

If you do not want a bullet train
आपल्या देशात बुलेट ट्रेन प्रोजेक्ट होत आहे मात्र त्याला अनेक विरोध करतांना दिसत आहेत.मात्र याला विरोध करत असललेल्या लोकांनी  बैलगाडीने प्रवास करावा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टला मनसे सह कॉंग्रेस पक्षाने  विरोध केला आहे. हा अत्यंत कमी किंमतीत प्रोजेक्ट पुर्ण होत असल्याचं मोदी यांनी सांगितले आहे. हा प्रोजेक्ट काँग्रेस सरकारलाही रण्याची इच्छा होती मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते विरोध करत आहेत असे नरेंद्र मोदीं यांनी सांगितले आहे. या प्रोजेक्टला विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. आमची काही हरकत नाही उलट आम्हला आनंद होईल असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली.