testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रेल्वेकडून महिलांसाठी आता लोअर बर्थचा कोटा निश्चित

indian railways
Last Modified मंगळवार, 13 मार्च 2018 (15:15 IST)

भारतीय रेल्वेने

महिलांसाठी आता लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विविध कोचमध्ये महिलांसाठीच्या लोअर बर्थची संख्या निश्चित करण्यात आलीये. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या सर्वच स्लीपर क्लासच्या कोचमध्ये सहा-सहा बर्थ महिलांसाठी आरक्षित केले जातील. सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर ही सुविधा लागू केली जाणार आहे. त्यासोबतच गरीब रथच्या एसी-३ कोचमध्येही सहा बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत. तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या थर्ड एसी-सेकेंड एसी कोचमध्ये ३-३ बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत.

राजधानी आणि दुरोंतोसोबतच पूर्णपणे एसी रेल्वेच्या एसी-३ मध्ये चार लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महिला प्रवाशांसाठी लोअर बर्थ निश्चित करण्यासाठी आयटी शाखा क्रिसकडून रिझर्वेशन सिस्टममध्ये नवीन सॉफ्टवेअर विकसीत केलं जात आहे. सोबतच
रेल्वेकडून आता वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यात महिलांना त्यांच्या वयानुसार प्राधान्य देण्याची सिस्टम डेव्हलप करत आहे. इतकेच नाहीतर रेल्वेत बर्थ रिकामा असल्यास टीटीई सुद्धा महिलांनाच प्रथम बर्थ देणार. तर वरिष्ठ नागरीकांसाठी आता वेगळा कोटा ठेवला जाणार आहे. वयोवृद्ध नागरीकांनाही लोअर बर्थ देण्याची सिस्टम तयार होत आहे. रेल्वे अधिका-यांनुसार लोअर बर्थ रिकामा असल्यास इतर प्रवासी तो बुक करू शकतील.यावर अधिक वाचा :

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही - खा. शरद पवार

national news
काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली...आम्हाला बाहेरचा दत्तक ...

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध

national news
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान ...

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' : अशोक

national news
मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' म्हणून ...

माधुरी पुण्यातून लोकसभा लढणार?

national news
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सत्ताधारी भारतीय जनता ...

लहान बाह्या घालणे महागात पडले, महिला पत्रकाराला संसदेतून ...

national news
कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला पत्रकार लहान बाह्यांचा ड्रेस घालून संसदेत पोहचली. तिचे ...