गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:34 IST)

रेल्वेत आरक्षणाची यादी प्लाझ्मा स्क्रीनवर दिसणार

रेल्वेत आरक्षणाची छापील यादी रेल्वे कोचच्या दरवाजावर लावली जाते. मात्र आता ही यादी ‘डिजिटल’रुप घेणार आहे. कारण कागदावरील छापील यादी आता प्लाझ्मा स्क्रीनवर दिसणार आहे. रेल्वेच्या A-1, A आणि B या वर्गात मोडणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरुन सुटणाऱ्या गाड्यांच्या दरवाजावर यापुढे प्लाझ्मा स्क्रीनवर आरक्षणाच्या याद्या दिसतील. रेल्वे प्रशासनाने तसा आदेश दिला असून, येत्या एक मार्चपासून आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
 
सुरुवातीच्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आरक्षणाच्या याद्या प्लाझ्मा स्क्रीन दाखवल्या जातील. याआधी तीन महिन्यांसाठी नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, हावडा आणि सीयाल्दाह या स्थानकांवर असा प्रयोग करण्यात आला होता. ज्या ठिकाणी प्लाझ्मा स्क्रीन लावल्यानंतर तिथे प्रवाशांना आरक्षण यादी पाहणं सोयीचं जाईल आणि जिथे प्लाझ्मा स्क्रीन चांगल्या प्रकारे काम करेल, अशा ठिकाणी छापील याद्या चिकटवणं बंद केले जाईल, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.