मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (09:04 IST)

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोट ही आहे कारणे

बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र ,माजी मंत्री तेज प्रताप याने पत्नी ऐश्वर्या रायला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असून बातमी सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्याने घटस्फोटासाठी  पाटण्याच्या कोर्टात अर्जही केलाय. ऐश्वर्याने आपल्याला धोका दिल्याचा आरोप तेज प्रतापने केला. या तिच्या वागण्यामुळे  मला मानसिक त्रास झाल्याचेही त्याने सांगितले आहे. तेज प्रताप जेव्हा पाटण्याहून रांचीला जात होता तेव्हा माध्यमांनी विचारल्यावर  प्रतिक्रिया दिली. तेज प्रतापचे वकील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते, त्यामुळे ही गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. तेज प्रताप सांगतो की  मला कृष्णासारखे रहायचे आहे परंतु ऐश्वर्या ती राधा नाही बनू शकली नाही . दुसरीकडे लालू प्रसादच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळले आहे. लालू पुत्र तेज प्रताप आणि राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते