testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किडनी विकू इच्छितो हा माणूस... जाणून घ्या कारण

मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणारा एक माणूस किडनी विकू इच्छितो आणि यासाठी त्याने जागोगाजी पोस्टर लावले आहेत. पत्नीसोबत वादामुळे पूर्णपणे बरबाद झाल्याचं तो सांगतो. कोर्टाच्या आदेशानुसार घटस्फोटानंतर पत्नीला दरमहा 2200 रुपये आणि अंतरिम राहत 30 हजार रुपये देण्याची क्षमता नसल्यामुळे मला किडनी विकावी लागतेय असे त्यांनी सांगितले.
प्लंबर म्हणून काम करणारा प्रकाश अहिरवाल या व्यक्तीने जाहिरातीसोबत आपला फोटोदेखील लावला आहे. हे पोस्टर लोकांसाठी चर्चेचा विषय ठरलं असून लोकं हैराण होत पोस्टर वाचत आहे.

गेल्या 2 महिन्यात 25 लोकांनी किडनी खरेदी करण्यासाठी त्याच्याशी संपर्कही केला परंतू 50 लाख रुपयात कोणीही किडनी खरेदी केली नाही. तसेच काही लोकांनी त्याला किडनी न विकण्याचा सल्ला देत कोर्टात केस लढण्याचाही सल्ला दिला.


यावर अधिक वाचा :