testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुजरात निवडणुक : राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

rashatrawadi congress
गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादी सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 2007 आणि 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडणून आले होते.

दोन्ही पक्षातील तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त जागा मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार केली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :