बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (17:24 IST)

गोव्यात निपाह विषाणूचा संशयित रुग्ण सापडला

गोव्यात निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे.हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण  हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

केरळमध्ये सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण समोर आलेले नाही. मात्र  आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे.