मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 मार्च 2018 (08:43 IST)

गडकरीनी राज यांना अहवाल पाठवून दिले उत्तर

आतापर्यंत मी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना पाठवण्याल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. याबाबतचा 25 पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला.  यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं कुठं किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला,  किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी 2 लाख 82 हजार कोटी, बंदरविकासासाठी 70 हजार कोटी तसंच सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचं, गडकरींनी राज ठाकरेंना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे. 
 
मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली होती. शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात, कामं करत नाही, असा आरोप केला होता. त्याला आता गडकरींनी लेखी उत्तर पाठवलं.