testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'विरुष्का'च्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी

Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (09:49 IST)

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं यांच्या दिल्लीमध्ये पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली आणि दोघांना शुभेच्छा दिल्या.

याआधी विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं जाऊन पंतप्रधानांना लग्नाचं आमंत्रण दिलं होत. या दोघांच्या आमंत्रणाचा मान ठेवून मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले. रिसेप्शनच्या आधी विराट आणि अनुष्का माध्यमांसमोर आले.

'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आल होत. आता येत्या
२६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.यावर अधिक वाचा :