testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाच राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त

Last Modified रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:23 IST)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी पाच राज्यांमध्ये
नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तर एका
केंद्रशासित प्रदेशामध्ये उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विद्यमान राज्यपालांना हटवून त्याजागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामनाथ कोविंद यांनी शनिवारी या निर्णयाची घोषणा केली आहे.

बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. निवृत्त अॅडमिरल देवेंद्रकुमार जोशी यांची केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून बिहारच्या राज्यपाल पदाची जागा रिक्त होती. आता सत्यपाल मलिक यांची राज्यपाल पदी निवड झाली आहे. प्राध्यापक जगदीश मुखी यांच्याकडे आसामच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गंगा प्रसाद हे मेघालयचे नवे राज्यापाल असणार आहेत. बी. डी. मिश्रा यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यावर अधिक वाचा :