testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रियंका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळले

Last Modified गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (11:02 IST)

अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि तिची आई मधू चोपडा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.

याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ही कारवाई एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तक्रारीनुसार प्रियंकाचा परिवार गेल्या १७ वर्षांपासून या भागात फिरकलासुद्धा नाही. ते मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी जणूकाही हा परिसर कायमचा सोडला आहे. अशात त्यांना या भागात मतदानाचा हक्क का द्यावा? असा प्रश्न उपस्थित करीत या माय-लेकीचे नाव वगळण्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोघींचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.यावर अधिक वाचा :