बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (17:19 IST)

राहूल निघाले मानसरोवर यात्रेसाठी

कैलास मानसरोवर यात्रेसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 31 ऑगस्टपासून जाणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा मानस व्यक्त केला होता. नेपाळमार्गे राहुल गांधी कैलास मानसरोवरला जाणार नाहीत, असं वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिलं आहे. त्याऐवजी ते तिबेट-चीनमार्गे कैलास मानसरोवरला जाणार आहेत.
 
कर्नाटक विधानसभा निवडणुक होती तेव्हा प्रचार करतांना राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र अखेर त्यांचं विमान सुरक्षित लँड झालं. त्यानंतर बोलताना राहुल गांधींनी तांत्रिक बिघाडाचा उल्लेख केला होता. 'विमान काही वेळ हवेतच थांबलं. लवकरच कैलास मानसरोवरला भेट द्यायला हवी, असा विचार त्याक्षणी माझ्या मनात येऊन गेला,' असं राहुल गांधी पत्रकारांशी सांगितले होते.