शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (10:24 IST)

नव्या राजधानी एक्सप्रेसची यशस्वीरित्या चाचणी

railway rajdhani express
मध्य रेल्वेकडून सुरु करण्यात येणारी राजधानी एक्सप्रेस सुरु करण्याच्या हालचाली वेगात सुरु असून या गाडीची सीएसीटी ते इगतपुरीपर्यंतची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून दुसरी चाचणी सोमवारी पार पडणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.  मुंबई- नाशिक भुसावळमार्गे दिल्लीला जाणारी ही गाडी सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. 
 
सध्या मुंबई सेंट्रल, तसेच वांद्रे टर्मिनस येथून दोन राजधानी एक्सप्रेस धावतात. परंतु प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद पाहता या गाड्यांचे बुकींग अनेकदा फुल्ल असते. त्यामुळे आणखी राजधानी एक्सप्रेस गाडी सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. त्यानुसार नव्याने सुरु होणारी ही गाडी नाशिक जळगांव मार्गे दिल्ली येथे सुरु करण्यात येणार आहे.