गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुन्हा एकदा राम रथ यात्रा 25 लाखांचा रथ

हो हे खरे आहे आता राम मंदिर बांधण्याची मागणी करण्यासाठी महाशिवरात्रीपासून अयोध्येत रथयात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील संस्था श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटी आणि विश्व हिंदू परिषदेने या 'रामराज्य' रथयात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद किवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही यात्रा अयोध्येतून सुरू होणार असून  रथयात्रेचा तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये समारोप होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 28 वर्षापूर्वी अयोध्येत रथयात्रा काढली होती. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारची रथ यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. यामध्ये 'रामराज्य' रथयात्रेसाठी विशेष रथ तयार करण्यात आला  असून, हा रथ तयार करण्यासाठी 4 महिने लागले आहेत.

यासाठी  त्यावर 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा रथ लाकडाचा असून त्यावर 28 पिलर्स बांधण्यात आले आहेत. या रथाची प्रतिकृती राम मंदिरासारखी आहे.