Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

जादू की झप्पी, संजू बाबा, मायावती आणि कोर्ट

संजय दत्त चे अर्धे दिवस कोणत्या कोर्टात केस सुरु आहे असे पाहण्यात जात असावा बहुदा. कारण पुन्हा एकदा कोर्टाची नोटीस त्याला मिळाली असून पुन्हा त्या कोर्टात उभे रहावे लागणार आहे. यामध्ये संजू बाबाला उत्तर प्रदेशातील एका स्थानिक कोर्टाने समन्स पाठवला
आहे.यात जोश मध्ये येवून संजय दत्त ने बहुजन पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना जादू की झप्पी देतो असे म्हटले होते. यात वाद निर्माण झाला होता. यामध्ये बेबाक पणा करत संजय ने लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेश येथे
समाजवादी पक्षाचा प्रचार केला होता. यामध्ये दिनांक 19 एप्रिल 2009 प्रचारसभेत मुन्नाभाई एमबीबीएस
सिनेमातील ‘जादू की झप्पी’ हा डायलॉग उपस्थितांसमोर मारला.
एक जादू की झप्पी त्यावेळच्या सपाच्या प्रमुख विरोधक मायावतींनाही देतो असे तो म्हटला होता. हे वक्तव्य चुकीचे आहे असे म्हणत बसपा जय दत्तच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत कोर्टात खटला दाखल केला होता. संजय दत्तला 16 नोव्हेंबरला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :