बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 13 मार्च 2018 (11:03 IST)

सगळे 'मोदी' लुटारू; सीताराम येचुरी यांचा दावा

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून अनेक मोदींची नावे कानावर ऐकायला येत आहेत आणि हे सगळे मोदी लुटारू असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी येचुरी मुंबईत आले असून त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आदींचा संदर्भ देत येचुरी म्हणाले की, सरकारची साथ असल्याशिवाय हे लोक देश सोडून जाऊ शकत नाहीत. या लुटारूंना देश सोडून जाण्यासाठी सरकार मदत करते परंतु शेतकर्‍यांना मात्र कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिला जातो व शेतकरी आत्महत्या करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.
 
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक असून तसे झाले नाही तर शेतकरी जगणार नाही, आणि शेतकरी तगला नाही तर कुणीच जगणार नाही असे येचुरी म्हणाले. भारताचा कणा हा शेतकरी असून त्याच्याशिवाय देशाला भवितव्य नसेल असे सांगत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.