सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (10:36 IST)

स्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला

सिनेनिर्मात्या स्मिता ठाकरे यांच्यावर मंगळवारी दुपारी बेंगळुरूमध्ये एका कॅब चालकाने हल्ला केला. या चालकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
या घटनेत  गाडी चालवताना गाडीचा चालक दयानंद (वय ३०) सतत फोनवर बोलत होता. फोनवर बोलण्याच्या नादात विमानतळ रोडवरील कवूर येथे त्याने गाडीचा अचानक ब्रेक मारला. अचानक ब्रेक लावल्यामुळे स्मिता आणि त्यांच्या मैत्रिणीला जोरदार धक्का बसला. याबद्दल स्मिता यांनी त्या चालकाला चांगलेच खडसावले. पण चालकावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्या चालकाने असभ्य भाषेत स्मिता यांना शिवीगाळ केली आणि त्यांचा गळा पकडून त्यांना मारहाणही केली. स्मिता ठाकरे मंगळवारी दुपारी वनदुर्गा मंदिरात गेल्या होत्या. यानंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी इनोव्हा गाडीत बसल्या.त्यावेळी हा प्रकार घडला.