testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

त्या कारणासाठी तिला विवस्त्र करून मारहाण

दिल्लीत विचित्र घडली आहे. यामध्ये एका महिलेला इतर महिलांनी तिचे कपडे फाडून तिला विवस्त्र करत तिला मारहाण केली आहे. झाले असे की नशा मुक्ती पंचायतची कार्यकर्ती असलेली या महिलेने नरेला भागात सुरू असलेल्या
बेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल पोलीसांत व दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर कारवाई करत यादारूच्या अड्ड्यावर छापा टाकल होता आणि ३५० बाटल्या जप्त केल्या होत्त्या. त्यामुळे तक्रारदार महिलेचा दारू माफियांना राग आला होता.
सुमारे १०-१२ दारू तस्करी करणाऱ्यांनी महिलेच्या घरावर हल्ला केला. यात काही महिलांचाही समावेश होता. पीडित महिलेवर रॉ़डने वार करण्यात आला. त्यानंतर तिचे कपडे फाडून तिला रस्त्यावर विवस्त्र करत मारण्यात आले होते. पोलीसांनी चार महिलांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.


यावर अधिक वाचा :