testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून १६ विशेष ट्रेन

Last Modified मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (12:29 IST)

दिवाळीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने १६ विशेष ट्रेन चालण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ४ विशेष ट्रेन या कोकण मार्गावर धावणार आहेत. १२ विशेष ट्रेन उत्तर महाराष्ट्रातून धावणार आहेत.

दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये गावी जाणाऱ्याची संख्या मोठी आहे. यामुळे सध्या असलेल्या ट्रेन या हाऊसफुल्ल असून, प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोचुवेली या मार्गावर ४ विशेष ट्रेन धावणार आहेत. ०१०७९ विशेष ट्रेन १७ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत चालवण्यात येणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा मार्गे रत्नागिरी, कणकवली स्थानकातून गंतव्य स्थानी ही ट्रेन धावणार आहे. या गाडीचे २ सामान्य डबे हे अनारक्षित असणार आहेत. या ट्रेनचे बुकिंग आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.यावर अधिक वाचा :