बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (10:08 IST)

महिलेचा शरीरसबंधास नकार युवकाने केली तिची हत्या

महिलेने सेक्सला नकार दिल्याने विवाहित महिलेची २५ वर्षीय तरुणाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भिवंडी येथील शांती नगर परिसरात ही संतापजनक प्रकार घडला आहे. या नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडीची शिक्षी सुनावली. या तरुणाचे मृत विवाहित महिलेसोबत शारिरीक संबंध होते. आरोपी गेले काही दिवस सतत महिलेच्या घरी जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले, दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समजले आहे. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ‘सेक्सला नकार दिल्याने मी तिची हत्या केल्याची’ कबुली आरोपीने दिल्याचे शांती नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी सांगितले आहे.