testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्यंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

Last Modified सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:51 IST)

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी
काँग्रेसप्रणित ‘यूपीए’चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला आहे. व्यंकय्या नायडू यांच्या पारड्यात ५१६ मते पडली असून गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली.
या विजयासाठी गोपाळकृष्ण गांधी यांनी व्यंकय्या नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक शनिवारी पार पडली.
सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत मतदान झाले.
७८५ पैकी ७७१ जणांनी मतदान केले. संध्याकाळी पाच पर्यंत ९८. २१
टक्के मतदान झाले.
उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार होते. स्वत: एनडीएकडे सव्वाचारशे मते होती. शिवाय त्यांना अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेससारख्यापक्षांचा पाठिंबा होता.यावर अधिक वाचा :